Ad will apear here
Next
बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बारामती येथे तालुका प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच म. ए. सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचा कार्यक्रम म. ए. सोसायटीच्या मैदानावर घेण्यात आला. 

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती नगरपालिकेचे नगरसेवक सचिन सातव, म. ए. सोसायटी नियामक मंडळ सदस्य आणि देशपांडे विद्यालयाचे महामात्र गोविंदराव कुलकर्णी, सोसायटीचे कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, तहसीलदार विजय पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, सहायक निबंधक श्री. करे, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुभाष बर्गे, प्रो कबड्डी खेळाडू दादासो आव्हाड, प्रमुख प्रशिक्षक बारामती कराटे असोशिएशनचे प्रो. रवींद्र कराळे, सायकल कल्बचे पदाधिकारी व सदस्य, आजी–माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, शासकीय अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रशिक्षक व खेळाडू, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक असे मिळून सुमारे चार हजार ७०० जण यात सहभागी झाले होते. 


योग प्रशिक्षक दादासो शिंदे व अनिल गावडे यांनी योगाभ्यास करून घेतला. या बरोबरच माळेगाव बुद्रुक येथील बारामती तालुका क्रीडा संकुलातही आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सुमारे साडेतीनशे लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून योगदिन उत्साहात साजरा केल्याची माहिती बारामती तालुका क्रीडा अधिकारी लकडे यांनी दिली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZKUCB
Similar Posts
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात जागतिक योगदिन साजरा पिंपरी : येथील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रात स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे आज (२१ जून) आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा झाला.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आज (२१ जून) आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त योग प्रशिक्षक म्हणून गणेश कालापुरे, हर्षदा देशपांडे, सहकारी प्रशिक्षक प्रदीप खोले यांनी प्रात्यक्षिकांसह योग प्रशिक्षण दिले; तसेच विविध आसनांचे आरोग्याशी असणारे महत्त्वही विशद केले.
राष्ट्रीय आयोगाच्या तज्ञ समिती सदस्यपदी प्रा. विनायक लष्कर बारामती (पुणे) : प्रा. विनायक सुभाष लष्कर यांची राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि निम्नभटक्या जाती-जमाती आयोगाच्या तज्ज्ञ समिती सदस्यपदी (कार्यगट) नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगात एकूण आठ कार्यगट असून, प्रा.लष्कर हे त्यापैकी तीन गटांचे सक्रिय सदस्य आहेत. या कार्यगटांमध्ये भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांचे
‘शिक्षणातील बदलते प्रवाह जाणून घेणे गरजेचे’ बारामती : ‘पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. हा बदल करण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात बदलत असलेले प्रवाह जाणून घेणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे विभागाचे उच्च शिक्षण सह संचालक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language